पुनर्भेट भाग १६ - अंतिम भाग

(32)
  • 11.5k
  • 1
  • 5k

पुनर्भेट भाग १५ रात्रभर मेघनाच्या शेजारी रमा झोपली होती . पण नुसते डोळे मिटून पडले तर झोप थोडीच येणार ? विचारांचा भुंगा नुसते डोके खात होता .. झोप न लागलेल्या अशा कैक रात्री रमाच्या आयुष्यात आजपर्यंत आल्या होत्या . पण ही आजची रात्र मात्र सगळ्याचा कळस होता . रात्रभर नुसते विचार विचार आणि विचार .. भविष्यात काय घडणार आहे याचे फक्त तर्क वितर्क ..! कशी असेल आपल्या तिघांची ही पुनर्भेट ..? त्या लांबलचक रात्रीनंतर सकाळ उजाडली इतकेच घडले . उजाडताच रमा उठली आणि कामाला लागली . कामाच्या नादात थोडेसे विचार तरी मागे पडतील असे तिला वाटले . नेहेमीची कामे होता