विजनवास.

  • 6.2k
  • 1.9k

सूर्यनारायणाने बुडी मारली त्यानंतर थोड्याच अवधीत काळोखाचं साम्राज्य पसरलं. काळोखाचं साम्राज्य म्हणजे- ज्यांचा प्रेमभंग झालाय त्यांच्यासाठी-दुःखाच साम्राज्य. काळोखाच्या साम्राज्यात सुख फुलत नाही अशातला भाग नाही पण ते सुख फुलवण्यासाठी सोबत असावा लागतो- जोडीदार! सोबत असावं लागतं-प्रेम! आणि सोबत असाव्या लागतात-भावना! एकट्याने जिणं जगायचंच त्या व्यक्तीसाठी काळोखाचं साम्राज्य हक्काची जागा बनवून देतं. जग जेव्हा निश्चल पडलेलं असतं तेव्हा 'ती' जागा दु:खी जीवांना सुखाच्या राज्यात नेऊन सोडण्यासाठी सज्ज झालेली असते. रात्री या जीवांना तिथेच जावं लागतं. जर तुम्ही दुःखी असाल तर तुम्हाला तिथे जावं लागतं आणि जर तुम्ही अति-आनंदी असाल तरीपण तुम्हाला तिथेच जावं लागतं. जर तुम्हाला एकांत हवा असेल