श्रीमंती

  • 7.2k
  • 2.3k

शहरातील गर्दीने गजबजलेला परिसर..आजूबाजूला हॉटेल्ससह अनेक गोष्टींची दुकाने...आणि रस्त्यावर कर्णकर्कश गाड्यांच्या , रिक्षाचा हॉर्नचा आवाज.. एक सुशिक्षित उच्च घराण्यातील दिसणारा माणूस एका बंद असणाऱ्या हॉटेलजवळ येऊन थांबला.. " एक्स्क्यूज मी " हॉटेलशेजारी असणाऱ्या एका छोट्याश्या टपरी वाल्याला लांबूनच आवाज देतो..मात्र आजूबाजूच्या आवाजाने टपरीवाल्याला काही आवाज जात नाही. तो माणूस नाखुषीने टपरी जवळ जाऊन उभा राहिला..आणि पँटच्या मागील खिशातून रुमाल काढत तोंडाला लावला. " बोला साहेब , काय देऊ ? मसाला पान ? " टपरीवाला त्याचा चेहरा निरखून बघत म्हणाला.. " अरे नाही नाही...हे..बाजूचे हॉटेल का बंद आहे ? आजूबाजूला कोणतेच हॉटेल का चालू नाही ? " त्या माणसाने त्याच्याकडे तुच्छतेने