शौर्यने आपल्या रूममध्ये शिरताच दरवाजा आतुन लावुन घेतला. वृषभ दरवाजा ठोकत शौर्यला आवाज देत बाहेरच उभा राहिला.. वृषभच्या आवाजाने आजु बाजूचे स्टुडंन्ट बाहेर येऊन बघू लागले. टॉनी आणि राजसुद्धा डोळे चोळत बाहेर आले. टॉनी : "ए वृषभ आरडा ओरडा कश्याला करतोयस..?आणि एवढ्या लवकर आलात पण तुम्ही ??आणि शौर्य कुठेय??" वृषभ काही बोलणार तोच शौर्यचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला.. वृषभला वाटलं की राग शांत झाला असेल म्हणून शौर्यने दरवाजा उघडला. पण तस काहीही नव्हतं. शौर्यच्या नजरेत त्याला राग स्पष्ट दिसत होता. हातात टॉवेल घेत तो तिघांकडेही न बघताच अंघोळीला निघुन गेला. राज : "शौर्यला काय झालं??कालची अजुन उतरली नाही का त्याची..??