कादंबरी - प्रेमाची जादू - भाग- ३५ वा

  • 9.9k
  • 1
  • 3.7k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- ३५ वा ------------------------------------------------------------ १. ******* नारायणकाका आणि जग्गुच्या बाबतीत जो काय निर्णय घायचा आहे तो घेण्याची जबाबदारी सगळ्यांनी जणू एकमताने यशच्या गळ्यात टाकली होती . त्यामुळे या कारवाईला आपण उशीर करीत गेलोत तर . .यात आपले तर नुकसान होणारच आहे ..आणि - ..मार्केटमध्ये असलेले इतर बिझिनेसवाले ..जे आपले मित्रच आहेत ..यातील काही जणांचे नुकसान जग्गुने आधीच केलेले आहे. म्हणून या मित्रांनी अपेक्षा व्यक्त करतांना म्हटले आहे की - यश – हा प्रोब्लेम तूच चांगल्या पद्धतीने सोडवू शकतोस .., कारण आम्ही जर आमच्या पद्धतीने हा प्रोब्लेम सोडवायचा प्रयत्न केला तर .. सगळा मामला हमरी-तुमरीवर येणार, मग