शेवटचा क्षण - भाग 23

  • 7.2k
  • 4k

गौरव - गार्गी, तू त्यादिवशी तुझ्या आणि प्रतिकबद्दल मला सगळं सांगितलं.. मीही ऐकलं.. आणि आजकाल सगळ्यांनाच भूतकाळ असतो.. त्यात काहीच नवल नाही.. पण एक प्रश्न मला पडला की हे सगळं तू मला आधी का नाही सांगीतलं?? आणि त्यादिवशी अचानक तुला त्याची आठवण आली आणि ती इतकी तीव्र की तू चक्क तापाने फणफणली.. म्हणजे आजही तू प्रतीक आणि त्याच्या प्रेमासाठी किती भावूक आहेस.. गार्गी तुझ्या त्यादिवशीच्या त्या भावुक होण्याने माझ्या मनात खूप खूप सारे प्रश्न निर्माण केलेत ग.. आणि त्याची उत्तर मी स्वतःच स्वतःला द्यायचा प्रयत्न करतोय.. गार्गी - हो गौरव काही वेळासाठी मी भावुक झाले होते कारण खरच प्रेम होतं रे