शेवटचा क्षण - भाग 22

  • 8.6k
  • 4.1k

खिचडी झाली होती.. गौरवाने ताटात वाढून आणली आणि तिला "जेवून घे आणि आराम कर" एवढं बोलून निघून गेला.. त्याच काहीच न बोलणं तिच्या मनाला रुतत होतं.. पण तोही किती दुखावला आहे हे ही तिला कळत होतं.. त्याने काहीतरी बोलावं त्याच्या मनात काय आहे ते एकदा तरी सांगावं अस तिला मनोमन वाटत होतं.. पण गौरव खूप शांत झाला होता.. त्यानेही तिकडे ताट वाढून घेतलं आणि tv बघत जेवण केलं.. tv सुरू होता पण त्याच त्यात काय सुरू आहे याकडे लक्षच नव्हतं, तो त्याच्याच विचारात जेवत होता.. गार्गीच जेवण आटपून गार्गी ताट घेऊन बाहेर आली.. तेव्हा tv वर मल्याळम चॅनेल सुरू होतं