शेवटचा क्षण - भाग 13

  • 9.6k
  • 1
  • 4.7k

अगदी आनंदात मज्जा घेत घेत पाहिलं वर्ष कसं संपलं दोघांना कळलंही नाही.. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला गौरव आणि गार्गी barbeque मध्ये गेलेत.. गार्गीने त्यादिवशी मुद्दाम लॉंग, स्लीवलेस, स्किन टाईट onepiece घातला होता.. त्यावर हलकासा ड्रेसला साजेशा मेकअप.. ती खूपच वेगळी आणि stunning दिसत होती.. तिला बघून गौरव तर पुरता वेडा झाला होता.. barbeque मध्ये जायची गार्गीची कधीची इच्छा होती, पण कुठल्या तरी पर्वावर जाऊ यात अस तीच सुरू होत.. म्हणून मग लग्नाच्या वाढदिवशी गौरव तिला तिकडे घेऊन गेला.. तिथे त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे कळल्यावर तिथल्या वेटर नि केक आणला.. आणि सगळा त्यांचा स्टाफ गौरव आणि गार्गी भोवती जमा झालेत.. गार्गीला आधी कळलंच नाही