कथा फिटलेल्या पैशांची

  • 7.7k
  • 2.4k

एके दिवशी ती अचानक पणे माझ्या घरी आली.ताई मला तुमच्या घरी कामावर ठेवा अशी विनंती ती मला करू लागली."अगं पण माझ्याकडे सध्या बाई आहे कामाला, तिला असं अचानक मी कसं काढू ?"तिला कारण तरी काय सांगू मी?" "ते काही नाही, मी तुमचं काही ऐकणार नाही, मला तुम्ही कामावर ठेवा म्हणजे ठेवा." तिने ठणकावून सांगितले. मी कितीही डोके फोड केली तरी ती माझं काहीही ऐकायला तयार नव्हती. सारखं "मला कामावर ठेवा, मला कामावर ठेवा" म्हणून तगादा लावतं बसली होती. कितीही समजावलं तरी तिच्या डोक्यात जात नव्हते. शेवटी मी तिला "आधी शांत बस नि नाश्ता पाणी कर. नंतर काय ते