शेवटचा क्षण - भाग 11

  • 10k
  • 2
  • 4.7k

आज लग्नाचा दिवस आला.. गार्गी लग्नाच्या त्या मरून शालू , हिरवे काठ आणि सोनेरी ओढणी मध्ये खूपच सुंदर दिसत होती.. गौरव तीचं पहिलं प्रेम नसला तरी तो तिच्यावर किती प्रेम करतो तिला माहिती होतं आणि एवढं प्रेम करणारा, समजून घेणारा, विश्वासु त्याच्यासारख्या मुलगा तिचा नवरा असणं तीच सौभाग्यच आहे असं ती समजत होती.. आणि म्हणूनच गौरवसोबत लग्न करण्याची खुशी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.. ..तसाच गौरवही सोनेरी रंगाच्या शेरवणीत खुलून दिसत होता.. आणि आजच्या दिवसाची तर त्याने कधीपासून आतुरतेने वाट पाहिली होती.. आज गार्गी त्याची होणार म्हणून त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होत..रंग, उंची , बांधा आणि एकमेकांना समजून घेण्याची क्षमता