अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 6

  • 12k
  • 5.9k

सीमा : "अरे वाह शौर्य तु कोणाच्या प्रेमात पडलास..आम्हाला पण कळू दे. कोण आहे ती लकी गर्ल.." शौर्य समीराकडेच बघतो.. (दोन मिनिटं का होईना सगळ्यांच्या हृदयाची धडधड वाढलेली असते. ) सीमा : "शौर्य मी तुझ्याशी बोलतेय." "आहे कोणी तरी.. स्पेसिअल", शौर्य थोडे रोमँटिक असे हाव भाव चेहऱ्यावर आणतच बोलतो.. राज, वृषभ आणि टॉनी तिघेही त्याच्याकडे बघतात. हा आता सांगतोय की काय अस त्यांना वाटत असते.. समीरा : "आम्हाला सुद्धा सांगु शकतोस..नाही म्हणजे जर तु आम्हाला आपलं समजत असशील तर.." "ठिक आहे तु एवढं बोलतेस मग सांगतो. मी जिच्या प्रेमात आहे ती.."शौर्य समीरावर आपली नजर रोखत बोलायच थांबतो.. "ती म्हणजे" (चौघेही