अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 5

(16)
  • 14.8k
  • 6.6k

"तुम्ही लोक सगळे असे का बसलेत???" राजचा आवाज ऐकताच चौघांनी घाबरतच माना वर करून पाहिल्या... समोर राजला बघताच चौघांच्याही जिवात जिव आला. वृषभ आणि टॉनी रागातच त्याच्याकडे पाहू लागले. राज : "काय झालं?? तुम्ही असे का बघतायत??" रोहन : "हा पोलिसांच्या व्हेनचा आवाज????" "कशी वाटली माझी आयडिया...???" हातातील मोबाईल चौघांना दाखवतच राज आपल्या दोन्ही भुवया उडवु लागला. चौघांनी सुटकेचा श्वास सोडला.. वृषभ, शौर्य आणि टॉनी धावतच राजला मस्तीत मारू लागले. राज : "अरे झालं तरी काय??" वृषभ : "तुझ्या ह्या आवाजाने आमचा आवाज कायमचा बंद झाला असता." राज : "अरे... " शौर्य : "गप्पबस एक शब्द बोलु नकोस. ती लोक