घरी गेल्या गेल्या महादुने बायकोच्या हातात तो गोफ ठेवला आणि घडलेली हकीकत सांगितली. ते ऐकून आश्चर्याने तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. पण तिला हि गोष्ट आवडली नाही. देवीच्या मंदिरातला दागिना असा उचलून आणायला नको होता असं तिला वाटत होतं. उगाच देवीचा कोप वैगेरे व्हायचा. पण महादुने आपल्या देवभोळ्या पत्नीकडे दुर्लक्ष करत तो हिरा आणि गोफ घरातच ठेवला. पुढे आठवडाभराने शहरात जाऊन त्याने दोन्ही सोन्याचे गोफ सराफाकडे विकून टाकले. एकदम एवढं सोनं पाहून कुणाला शंका येऊ नये म्हणून त्याने प्रत्येक गोफेचे ३-४ तुकडे केले. आणि प्रत्येक तुकडा वेगळ्या सराफाला विकला. हिरा विकणं मात्र जरा जिकीरीचंच होतं. "एवढा मौल्यवान हिरा तुझ्याकडे कुठून आला?" या प्रश्नाचं कोणतंही समाधानकारक उत्तर त्याच्याकडे