मित्रांचे अनाथाश्रम - भाग ९

  • 10.1k
  • 2
  • 3.6k

मी, "संजय बद्दल काय सांगत होता ..."विवेक त्या दिवशी काय घडलं त्या बद्दल सांगायला लागला.आश्रमात आम्ही चौघे म्हणजे मी, संजय, आम्या आणि सुरेश काका गप्पा मारत बसलो होतो. मला संजय चे बाबा गेल्याच समजलं होत. पण मी बाहेर गावी होतो. आल्या आल्या मी संजयला भेटायचं ठरवलं म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही आश्रमात जमलो. घरी जाणार होतो पण संजय नाही बोलला, त्यांच्या घरी प्रॉपर्टी वरून वाद सुरू होते त्याविषयी बोलायचं म्हणुन आम्ही बाहेर भेटायचं तर आश्रमात भेटलो. तो वाद काही मला प्रॉपर्टी पाहिजे असा नव्हता, तो वाद मला प्रॉपर्टी नको आहे यावरून होता. त्याच्या बाबांनी त्यांची निम्मी काकांच्या दोघं मुलांच्या नावावर तर,