कादंबरी - प्रेमाची जादू - भाग- ३४ वा

  • 10.3k
  • 3.4k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग- ३४ वा ----------------------------------------------------------------------------- आपल्या वर्कशॉपमध्ये -ग्यारेजमध्ये काम करणाऱ्या प्रामाणिक –पापभिरू नारायणकाकांच्या जग्गू या जावयाची सगळीकडे चांगलीच लबाडी , चलाखी सुरु होती. सगळ्यांच्या डोळ्यात अशी धूळफेक करणारा बदमाश जग्गू आपल्या उद्योगात .स्वताच्या मामाचा –जो आता त्याचा सासरा झाला होता त्या नारायणकाकांना पुढे करून, त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतो आहे हे कळल्यापासून यश खूपच गोंधळून गेला होता . लंचनंतर त्याने चौधरीकाका आणि सोबत मधुरा , दुसरी स्टाफ –सोनाली ..या तिघांना दुपारच्या वेळी केबिनमध्ये बोलवून घेतले . आणि मार्केटमधल्या दोन मोठ्या सेठ लोकांनी –जग्गू हा इसम काय काय करतो आहे , कसे कसे करतो आहे “, हे या तिघांच्या