दि लॉस्ट पेंटिंग

  • 11.6k
  • 4.1k

............................................................... प्रस्तावना :- ही एक सायकॉलॉजीकल , क्राईम , ड्रामा , सस्पेन्स , थ्रिलर अशी कथा आहे , यात सर्व घटना , व्यक्ती काल्पनिक आहेत , जर काही संबंध आढळून आला तर निव्वळ योगायोग समजावा. कथेचे सर्व हक्क लेखकाकडे असतील. ................................................................ दि लॉस्ट पेंटिंग ........................................................................ एका प्रशस्त बंगल्यासमोर लोकांची गर्लेली होती..पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या...काही पोलीस बाहेर तैनात होते...बंगल्याच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचे बॅरिकेड लावून मध्ये कोणालाही जाऊ देण्यात येत नव्हते...जमलेले लोक गेटबाहेर उभे राहुन मध्ये काय चालू आहे ते चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवत बघत होते. तेवढ्यात तिथे एक कार येऊन थांबली.. तसा एक पोलीस हवालदार पळत गाडीजवळ पोहोचला