मार्चमध्ये कोरोना आला आणि लाॅकडाऊन सुरू झाले. तेव्हापासून आम्ही सगळे घरीचं अडकलो होतो.ते बंद दार आणि वर्क फार्म होम करून जीव मेतकुटीस आला होता. घरात बायको,मी आणि मुलगा तिघंच त्यामूळे एकमेकांचे तेचं ते चेहरे पाहून सहाजिकच कंटाळाही आला होता.ना कोणी घरी येणार ना कोणी बाहेर जाणार.घर म्हणजे एक जेल वाटायला लागली होती.सगळं घरीचं आॅर्डर.भाज्या, कांदे, बटाटे,इतर वानसामान घरपोचं.दुध घरपोच.दार उघडून कधी शेजारच्यांना दारातूनच बोललो तरी घरी तासन् तास येऊन गप्पा मारणारे शेजारीही आता एखादा शब्द बोलूनच दार बंद करून घेऊ लागले होते.मुलगा बिचारा घरात एकटाच किती खेळणार ?तोही आता आताशा सारखा चिडचिड करु लागला होता.त्यामूळे मिसेस ही