अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 2

(12)
  • 15.1k
  • 8.6k

तिघेही जेवण आटोपुन पुन्हा होस्टेलवर जायला निघाले. गेट बाहेर पोहचताच टॉनीने कोणाला तरी फोन लावला आणि काही सूचना दिल्या. थोड्याच वेळात वॉचमेनच्या केबिनमधला फोन वाजु लागला. थोडस तोंडातल्या तोंडातच काहीस पुटपुटत वॉचमन आत फोन घेण्यासाठी गेला. तस वेळ न घालवता तिघेही गेटवरून उद्या मारून आत आले. वृषभ पुढे त्याच्या मागे टॉनी आणि मग दोघांच्याही मागे शौर्य अश्या पद्धतीने ते तिघ आत शिरत होते. वृषभ समोर कोण दिसत का बघत होता तर टॉनी मागुन कोणी येत का ते. तिघेही आत येणारच तोच समोरच दृश्य बघुन वृषभ जागीच थांबला तसा त्याच्या मागुन येणारा टॉनी त्याला धडकला. टॉनी : "तु असा मध्ये का