अभागी ...भाग 1

(13)
  • 20.4k
  • 1
  • 10.8k

कॉलेजच्या मॅगझिन वर स्वतः चा फोटो पाहून मधुरा खूपच शॉक होते ..आणि धावतच टीचर्स स्टाफ रूम कडे जाते ..वाटेतच तिला सायली, अनु, भेटल्या आणि तिला तिथेच अडवून बोलू लागल्या. सायली: काय ग मधू ? किती खोटारडी यार तू ? मधुरा : काय खोटं बोलले मी ? सायली : वा ,वा चोराच्या उलट्या बोंबा याला म्हणतात ..आम्ही किती रिक्वेस्ट केली की मॅगझिन साठी फोटो दे फोटो दे ,तेव्हा तर खूप भाव खाल्ल्यास आणि नाही देणार बोललीस आणि आज चक्क मॅडम चा फोटो मॅगझिन वर ..? अनु: तू तर छुपे रुस्तम निघालीस की मधू ? आता मधू ला दोघींचा खूप राग येतो