आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 6

  • 7.4k
  • 2.1k

भाग ६ आम्ही दिवस रात्र फक्त एकाच गोष्टीचा विचार करत होतो, आम्ही असे काय केले पाहिजे जेेणेकरून आमची आई बरी होईल.कारण आईची परिस्थिती अतिशय खालावत चालली होती.आमचे छोटेेेसे गाव असल्यामुळे तिथे चांगले दवाखानेेेही नव्हते.हालाकीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आईला गावाच्या बाहेर नेणे गरजेचे झाले होते.शत्रु असला तरीही त्यांच्यावर प्रेम करणारी आई आता सर्वांशी वाईट वागु लागली होती.हळुहळु ती सर्व विसरत चालली होती.आपला परिवार आहे, आपल्या मुुुुली आहेत सर्व काही.माझी ताई दुर शिक्षणाला जेेव्हा घरापासून दूर जात होती, तेव्हा डोळ्यांत अश्रू न मावणाऱ्या माझ्या आईच्या मनात आता कोणासाठीही भावना नव्हती.अशा या शापित आजाराने माझ्या आईला मुठीतच घेेऊन टाकले होते.कुठेतरी