धक्क्यावर बरीच गर्दी होती. अनेक लोक इकडून तिकडे घाई घाईत जात होते. काही आपली नाव पाण्यात उतरवायची तयारी करत होते. तर काहीजण नुसतेच उभे होते. त्यापैकीच एकाकडे जात शंकरने राम राम केला. त्यानेही किंचित हसून शंकरला प्रत्युत्तर दिले. आणि दोघांमध्ये काहीतरी बोलणं सुरु झालं. त्यांच्या बोलण्यात मोहनला काहीच रस नव्हता. त्याने आपली नजर पुन्हा समुद्र किनाऱ्यावर वळवली. मगाशी पाहिलेले चित्र अजूनही तसेच होते. गडबड गोंधळ, इकडून तिकडे जाणारी माणसं, मोटारींचा आवाज करत खोल समुद्रात मासेमारीसाठी निघालेल्या मोठ्या बोटी आणि त्यांच्या मागोमाग पाण्यात उतरणाऱ्या लहान लहान होड्या. "फट्ट फट्ट फट्ट" अचानक शेजारून येणाऱ्या आवाजाने तो दचकला. शंकर त्या