तू_ही_रे_माझा_मितवा... - 6

  • 15.5k
  • 1
  • 7.3k

आजूबाजूला असणारं भान हरपायला भाग पडणारं वातावरण, समोर,अगदी समोर असणारा वेद,त्याच्या मागे असणारा खळाळत्या पाण्याचा पडदा आणि मागच्या दगडाला पाठ टेकून उभी असलेली ती; आता मात्र कमालीची अस्वस्थ झाली होती. नकळत का होईना आपण वेदला आपल्या भावनांची जाणीव तर करून दिली नाही ना? ह्या विचाराने तिने त्याच्याकडे बघायचं टाळलं.ती बाजूने निघून जाण्याचा प्रयत्न करणार तसं वेदने दोन्ही हात तिच्या आजूबाजूने मागच्या भिंतीवर टेकवले, नजर अजून तिच्यावरच रोखलेली होती.तिला खरंतर वेदने असं काही करणं अगदीच अनपेक्षित होतं.तिने नाईलाजाने त्याच्या नजरेला नजर भिडवली.“हे बघ तू म्हणते तसं जर तू डिंपल कपाडिया बद्दल बोलत असशील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही,पण जर प्रॉब्लेम माझ्या