तू_ही_रे_माझा_मितवा... - 5

(11)
  • 14.4k
  • 1
  • 7k

लॅचचा जरासा आवाज झाला. अभय रुममध्ये आला तेव्हा अंधार होता.सवयीने त्याचा हात भिंतीवर चाचपडला आणि त्याने बटन दाबलं.प्रकाश पसरला तसं त्याने समोर पाहिलं रायटिंग टेबलवर डोकं ठेवून वेद झोपला होता.शेजारी लॅपटॉप आणि बियरच्या दोन रिकाम्या बॉटल.‘ ये रायटर..उठं’ त्याच्या खांद्याला धरून गदागदा हलवत अभय म्हणाला.“ये...भाव काय विषय आहे...हळू की जरा” डोळे उघडायचा प्रयत्न करत वेद म्हणाला.“साल्या दोन बॉटल उडवल्या तू? तुला माहितीय ना बियरसारखा छपरी आयटम पण चढतो तुला...कशाला रिस्क घेतो..काय आज एकदम ‘दारू पीके शायरी’ वैगरे मूड आहे का ?” फ्रेश होत अभय म्हणाला.“अभ्या...साल्या तुझी सेकंड शिफ्ट म्हणजे माझ्या डोक्याला त्रास असतो...मस्त झोपलो होतो..without any tension.. उठवायलाच हवं होतं का?” जडावलेल्या