तू_ही_रे_माझा_मितवा... - 4

(12)
  • 19.1k
  • 1
  • 8.5k

ऋतूला रात्री उशिरा जाग आली,अजूनही थकवा जाणवत असला तरी ताप उतरल्यामुळे जरा हुशारी आली होती.तिची चाहूल लागताच शेजारी पेंगुळलेल्या प्रिया आणि तनु लगेच उठल्या. तनुने तिला व्यवस्थितपणे भिंतीला टेकवून बसवलं, तिचं ब्लॅंकेट सारखं केलं.“You Ok?” तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रिया म्हणाली.मानेनेच होकार देत ती भिंतीला मागे टेकून बसली.“हे बघ आता आराम करायचा हं..दोन दिवस सुट्टी टाकायला सांगितली आहे डॉक्टर काकांनी.” तिला समजावणीच्या सुरात तनु म्हणाली.“दोन दिवस?..अजिबात गरज नाही.I am absolutely ok.आणि हो प्रिया, माझ्या घरी सांगितलं नाही ना? ते उगाच दोन दिवस तिकडे बोलावतील आणि मग पुन्हा लग्न,स्थळं,मुलं.. उगाचच कटकट,अबोला होता तेच ठीक होतं असं वाटतंय” ती वैतागत म्हणाली.“नाही ग