आयुष्याच्या सागरात... (कविता संग्रह)

  • 13.2k
  • 3.6k

१.आयुष्याच्या सागरात... आयुष्याच्या सागरात आशेच्या लाटांवर तरंगते स्वप्नांची होडी लाटेच्या प्रत्येक हिंदोळ्या वरती अवलंबतो होडी चा तोल संथ संथ हळव्या लाटा होडी ला आधार तरंगण्याचा जितक्या मोठ्या लाटा तितकीच ओढ लागते होडीला स्वप्न पूर्तीच्या किनाऱ्याची पण कधी कधी लाटांच्या भोवऱ्यात अडकते स्वप्नांची होडी अपयशाच तुफान घोंघावत लाटांची लाटाशी झुंज होते आशेच्या लाटानचाच त्या तयार होतो भोवरा अन् अडकते त्यात स्वप्नांची होडी किनारा तर दूरच राहतो आयुष्याच्या सागरात स्वप्नांची होडी मात्र लुप्त होते कायमची २.सर्वस्व तुज वाहिले मी... सर्वस्व तुज वाहिले मी कुंकवाचा माझ्या तू धनी नको करुस अपमान नात्याचा त्या मज दूषण ते लावुनी गरिबां घरची लेक जरी मी आहे