शेवटचा क्षण - भाग 3

  • 12.1k
  • 6.5k

थोडावेळणी प्रतिकही आला.. त्याला बघून गार्गीला तिच्याकडे लपून बघणारा प्रतीक आठवला आणि त्याची खेचायच्या उद्देशानी ती बोलली.. गार्गी - काय मग झालं का तुझं काम?? आणि चेहऱ्यावर का बारा वाजलेत?? गार्गीच लग्न करणार आहेत हे पचवणं प्रतिकला अवघड जात होतं.. आणि ते त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होतं.. प्रतीक - हो झालं.. ते आईला काम होतं तर घरी गेलो होतो.. आणि मला काय झालं चेहऱ्यावर बारा वाजायला.. मी तर खुशच आहे.. ( जरासा हसतच तो म्हणाला) स्वतःला शक्य तितक नॉर्मल ठेवायचा तो प्रयत्न करत होता.. पण त्याचे डोळे इतके बोलके होते की गार्गी ते सहज वाचू शकत होती.. विवेक -