शेवटचा क्षण - भाग 1

(12)
  • 23.3k
  • 10.9k

आज गार्गी खूप छान तयार होत होती.. पुन्हा पुन्हा आरश्यात स्वतःलाच बघून कधी लाजत होती तर कधी तिच्या या वेडेपणावर हसतही होती.. नेहमी अगदी साधी राहणारी गार्गी आज मात्र पूर्ण मेकअप करत होती.. कारणही तसंच होतं.. तिच्या बालमैत्रिणीच आज लग्न होतं.. घरच्यांनाही तिला चांगली तयार हो म्हणूनच सांगितलं कारण आता गार्गीच ही लग्न करायचं होतं आणि अश्या लग्नातच लोक बघतात आणि मग संबंध जुळतात असा त्यांचा विश्वास होता.. पण गार्गी तयार होत होती त्याला मात्र कारण काही वेगळाच होतं... आज या लग्नात तिचे सगळे जुन्या कॉलोणीमधले मित्र मैत्रिणी परिवार सोबत तिथे येणार होते.. त्यात प्रतिकही असणार होता... प्रतीक तिचा बालपणीचा