तुझी माझी यारी - 21 (अंतिम भाग)

(11)
  • 9.7k
  • 2
  • 3.4k

अंजली आणि नेहा ऑफिस ला जाण्यासाठी तयार होत होत्या तोपर्यंत बेल वाजली..नेहा ने जाऊन डोअर ओपन केलं .. तर डोअर मध्ये तीन चार गुंड टाईप व्यक्ती उभ्या होत्या..त्यातल्या एकाने नेहा ला पाहून विचारल.. व्यक्ती: अंजली ? नेहा : नाही..नेहा ..आपण कोण ? त्या व्यक्ती ने नेहा ला डोअर मधून बाजूला केलं व स्वतः आत घुसला त्याच्या सोबत त्याचे मित्र ही आत आले..नेहा मागून ओरडत आत आली. नेहा : ओ हॅलो..तुम्ही आहात कोण ? आणि अस कसं जबरदस्ती आमच्या घरात घुसत आहात ? तिचा आवाज ऐकून अंजली ही बाहेर येता येता बोलली . अंजली : नेहा ,काय झालं कोण आहे ?