एक रहस्य आणखी.. - भाग 1

(13)
  • 27.4k
  • 2
  • 13.3k

रेवती रक्ताळल्या डोळ्यांनी समोर येत होती... हातात असलेला धारदार चाकू विजेसारखा लख्ख चमकू लागला होता...रोहनच्या कानात कुठूनतरी जोरदार नगाड्यांचा आवाज घुमत होता..वाऱ्यांचा सन.. सन आवाजही आता त्याला स्पष्ट ऐकू येत होता जणू तो काही सांगत आहे असेच त्याला भासत होते.. मृत्त्यू त्याच्या काही पावलांवरच येऊन ठेपला आहे हे त्याला कळून चुकले होते. अचानक रेड्यांचा कर्कश आवाज त्याच्या कानी पडला जणू काही यमराज अगदी जवळ आले आहे असे त्याला वाटू लागले. रेवती अगदी दोन पावलांवरच येऊन उभी राहिली होती. विजेसारखा धारदार चाकू त्याला मारण्यासाठी वर उचलला गेला.. रोहनने डोळे मिटून "देवा या संकातूनही वाचव रे" असे म्हणून देवाचा धावा सुरु केला