अष्मांड - भाग २

  • 6.6k
  • 2.8k

मोहन नुकताच शाळेतून घरी आला होता. हात पाय धुता धुता त्याने बापाला विचारले, " आज नाही गेलात तुम्ही?" मान वर न करताच शंकर फक्त "हं " म्हणाला. कसल्यातरी जुनाट लालसर कागदात, जो कधी काली पांढरा असावा, त्यात डोकं खुपसून तो बसला होता. "कसलं खुळ लागलयं कुणास ठाऊक ? दुपारपासनं त्यात डोकं घालून बसलेत." शांता वैतागुन बडबडत होती. नेहमी कामावर जाणारा माणूस आज घरीच बसला त्यामुळे आजचा रोजगार बुडाला, तेवढेच शे - दोनशे रुपये रोजचे मिळतात तर आज ते पण नाही. शंकरकडं त्याच्या वडिलोपार्जित एक नाव होती. तिच्यावरच तो आणखी दोन साथीदारांसोबत मासेमारी करत. पण तीही