तू_ही_रे_माझा_मितवा... - 2

(13)
  • 15.6k
  • 1
  • 7.9k

#भाग_२रूमचा दरवाजा सरावाने धाडकन उघडत ऋतुजा आत आली आणि बेडवर पर्स फेकत ती तनुच्या गळ्यात पडली. तिच्या रुमी तनु आणि प्रिया आवक होऊन एकमेकांकडे बघत होत्या.तिच्या डोक्यावरून हात फिरवत तनु म्हणाली-“ये ऋतू काय झालं? जॉबच्या पहिल्याच दिवशी अशी का वैतागली आहेस?”तिच्यापासून बाजूला होत बेडवर बसत वैतागून ती म्हणाली-“यार तने बघ ना पहिल्याच दिवशी एका अत्यंत खडूस,स्टुपिड,मूर्ख आणि बेअक्कल मुलाशी पंगा झाला..”तनु आणि प्रिया दोघीही तिच्या ह्या वाक्यावर हसल्या.तिच्या डोक्यावर टपली मारत प्रिया म्हणाली-‘ऋत्या आता कॉलेज संपल ..हे नवीन लाइफ आहे,प्रोफेशनल लाइफ..! पंगे घ्यायचे दिवस संपले आता. Be matured ...चल आता फ्रेश हो,मी मस्त कॉफी करते ...मग तुझं फर्स्ट डे पुराण