तू_ही_रे_माझा_मितवा... - 1

(13)
  • 23.8k
  • 4
  • 12.7k

#भाग_१“इटर्निया बिजनेस सेंटर” नाव असलेले क्रोम प्लेटेड अक्षरे सकाळच्या कोवळ्या उन्हाने झळाळून निघाली होती. धावत पळत ‘ती’ तळमजल्याच्या लिफ्टजवळ आली. 3rd floor –“दि शोकेस मिडिया प्रा.लि.” ह्या नावावरून तिने हलकेच हात फिरवला, एक स्मित हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरलं आणि तिने लिफ्ट कॉल केली,लिफ्टमधे शिरल्यावर जरा केस एकसारखे केले, लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर आल्यावर ती घाईघाईने शोकेस मिडियाच्या ऑफिसमध्ये गेली, रिसेप्शनला ऑफर लेटर दाखवून तिने जुजबी माहिती घेतली.रिसेप्शनिस्टने उजव्या बाजूला हात दाखवत एका बोर्डकडे इशारा करत म्हटलं-“ मॅम तुम्हाला ऑलरेडी उशीर झालाय, ह्या बाजूला कॉन्फरन्स रूम आहे आणि induction lecture ऑलरेडी सुरु झालंय, your senior Mr. Arush Jadhav is very strict about the