मित्रांचे अनाथाश्रम - भाग ७

  • 9.9k
  • 3.9k

"काय ?", असे बोलून मी उभाच राहिलो,सर्वजण माझ्याकडेच बघत होते. संजय, "मलाही असच धक्का त्या दिवशी बसला"दरवाजा वाजला, संजय ची आई आणि काकू जेवण घेऊन आल्या होत्या. काकू आम्या जवळ जाऊन बसल्या. त्याच्या तब्येतीची चौकशी करू लागल्या. संजयच्या आई जेवणाची तयारी करत होत्या. मी आणि विवेक ने घरी जाण्याचं ठरवलं होत, आता आम्या सुध्दा ठीक झाला होता. दोन दिवस झाले घरी वेळ दिला नाही. सर्वांना सांगून मी आणि विवेक दोघेही बाहेर पडलो. मध्येच विवेक, "मला पण आत्ताच समजले"मी, "काय समजले"विवेक, "संजय संध्यावर प्रेम करतो ते"मी, "म्हणजे तुला नव्हतं माहिती"विवेक, "नाही, पण..."मला कुणीतरी मागून आवाज दिल्याचा भास झाला, मी वळून पाहिले तर कुणीच