पुनर्भेट भाग १३

  • 9.5k
  • 1
  • 4.8k

पुनर्भेट भाग १२ हळूहळू नव्या आयुष्याला रमा आणि मेघना दोघीही सरावत गेल्या . इतके दिवस आयुष्याचे भयंकर रंग पाहिल्यानंतर आता मात्र सगळे काही खरेच बरे चालले होते . पाच सहा महिन्यात रमा दुकानच्या कामात चांगली तयार झाली . तिची हुशारी आणि कामाचा वेग पाहून मालक पण खुष झाले . रमाने आता मेघनाला पहील्या वर्गात दाखल केले . शाळा जवळच होती . संध्याकाळी जरी रमाला दुकानाच्या कामामुळे उशीर झाला तरी वाड्यातील सर्व जण मेघनाकडे लक्ष देत . त्यामुळे रमाला घराची काळजी वाटत नसे . मोहन अधून मधून चौकशी करीत असे ,येत जात असे . दुकानात पगार बरा होता,दरवर्षी थोडा वाढवत असत