पुनर्भेट भाग १२

  • 11.5k
  • 1
  • 4.8k

पुनर्भेट भाग ११ आणि मग चार पाच दिवसातच काकांनी दवाखान्यात प्राण सोडला . शेवटपर्यंत ते शुद्धीवर मात्र आलेच नाहीत . त्यांच्याशी कोणाचेच बोलणे होऊ शकले नाही . काकुने तर रडून नुसता गोंधळ घातला होता . काकु आणि मेघनाकडे लक्ष देता देता रमाला स्वतःचे दुख्ख: मनातच दाबायला लागत होते . रमाने आता तिच्या घरचे बांधुन ठेवलेले सर्व सामान काकांच्या घरी आणले आणि घरमालकांना उरलेले पैसे देऊन ते घर सोडले . काय काय स्वप्ने पाहिली होती या घरात प्रवेश करताना आणि काय होऊन बसले होते . घर सोडताना रमाचा जीव तीळतीळ तुटत होता . त्यानंतरची वर्षे रमासाठी खुप कठीण होती . काकु