पुनर्भेट भाग ५

  • 14.7k
  • 7.3k

पुनर्भेट भाग ५ मेघना रितूकडून परत घरी आली तेव्हा आठ वाजले होते . आली तेव्हा खुपच खुशीत होती ती !! “आई इतकी मजा आली न रितुकडे . आणि जेवण सुद्धा मस्त केले होते मावशींनी, खुप पदार्थ केले होते . संध्याकाळी पण आम्हा मुलींसाठी बाहेरून पिझा ,केक, पास्ता असे पण मागवले होते . अगदी पोट फुटेपर्यंत खाल्ले बघ . आणि खुप दंगा ,धमाल केली ग .. कसला जबरदस्त वाढदिवस साजरा झाला रितूचा ..!! बर आई तु जेवलीस का ? आणि हा केक दिलाय बघ तुझ्यासाठी डब्यात रितुने रितुच्या आई तर बरेच पदार्थ देत होत्या पण तु फक्त केक दे म्हणलीस न