पुनर्भेट भाग ३

  • 13.9k
  • 8.6k

पुनर्भेट भाग ३ रमाही खुप हुशार होती . लहान वयात पाहिलेल्या आईवडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे जास्तच समंजस झाली होती . अबोल असलेल्या रमाचे काका काकुंवर खुप प्रेम होते . आई वडिलांच्या माघारी ते दोघेच तिची “दुनिया” होते . उत्तम मार्काने रमा दहावी उत्तीर्ण झाली . त्यानंतर तिने जिल्ह्याच्या गावी जाऊन आपले शिक्षण पुरे केले . पदवीधर झाल्यावर नोकरी करावी आणि घरात हातभार लावावा असा तिचा विचार होता . नोकरीसाठी जिल्ह्याच्या गावी जायची तिची इच्छा होती . पण काकांना ते मान्य नव्हते . रमाला ते आपल्यापासून लांब जाऊ द्यायला इच्छुक नव्हते . आता काका काकू बरेच वृद्ध झाले होते . त्यामुळे जी