पुनर्भेट भाग १

  • 20.8k
  • 4
  • 13.3k

पुनर्भेट भाग १ घड्याळाचा काटा साडेनऊ कडे गेलेला पाहताच रमाने हातातली पोळी तव्यावर टाकली आणि बाहेरच्या खोलीत बसलेल्या मेघनाला हाक दिली , “मेघु ये ग लवकर गरम पोळी घालतेय तुला ,ताट वाढले आहे तुझे . जवळच्या छोट्या टेबल वर एका ताटात रमाने भाजी ,कोशिंबीर वाढली होती . शेवटची गरम पोळी ताटात वाढून रमाने ग्यास बंद केला . आणि मेघनाच्या पोळीवर तुप वाढले . तोपर्यंत मेघना आत येऊन खुर्चीवर बसली,तिच्या शेजारीच रमा बसली . दोघींनी एकत्रच खायला सुरवात केली . मेघु माझी जायची वेळ झाली बर का आज सुजाता नाही येणार तेव्हा मलाच दुकान उघडायला हवे इथे तुझा डबा भरून ठेवलाय