होम मिनिस्टर (अंतिम भाग)

  • 11.7k
  • 1
  • 4.6k

रेवा घरात खरंच सगळ्यांची लाडकी होती. तेवढी ती सुगरण ही होती म्हणा. नीलिमाचे लग्न झाल्यापासून ती रेवावर खूप जळत असे. तिला रेवाचे कौतुक केलेले अजिबात आवडत नसे. रेवाचे लग्न झाल्यावर तर हा जलकुटेपणा अगदी उच्छकोटीला गेला. कारण रेवाच्या घरात ती, तिचा नवरा, तिचे सासरे. इतकीच माणसे. घरात प्रत्येक कामाला नोकर. पण रेवाला माणसांचा फार लळा. म्हणून महिन्यात दोनदा तरी रेवाच्या घरी गेट टू गेदर होत असे. रेवा सगळे पदार्थ स्वतः घरी बनवित असे. त्यावेळेस सगळेजण अगदी चट्टा मट्टा करीत तिच्या खाण्याची तारीफ करत ते पदार्थ खात असत. हे पाहून नीलिमा अजून जळफळत असे. असो, पोटे फॅमिलीचं गाऱ्हाणं सुरूच राहील. पण