मासिक पाळी पुरुषांपासून लपायलाच हवी का??

  • 4.9k
  • 1
  • 1.6k

मासिक पाळी खरंच पुरुषांपासुन लपायलाच हवी का??? आजही मुलीला मासिक पाळी आल्यानंतर काही परिस्थिती नजरेत आहेत. पहिल्यांदा जेव्हा मुलीला पाळी येते तेव्हा आजही त्या मुलीला मासिक पाळी आल्यानंतर काळजी कशी घ्यायची हे सांगितले जात नाही तर ही गोष्ट कोणाला सांगु नको किंवा वडिलांना आणि भावाला हे सांगायचं नाही हा..असे सांगुन मुलीला धिर न देता किंवा समजून न घेता,.नकळत आई किंवा आजीच्या बोलण्यातून तिला घाबरवले जाते... पण आजच्या या युगात तरी असे सांगणे मला योग्य वाटत नाही. काही घरात तर मुलीला जेव्हा त्यावेळी स्वतःच्या संरक्षणासाठी सँनीटरी पँडची गरज लागते, तेव्हा वडील बाहेर बाजारात असुनही त्यांना न सांगता स्वतः आई काहीतरी कारण