मित्रांचे अनाथाश्रम - भाग ६

  • 9.7k
  • 3.8k

संजय ने पुढची गोष्ट सांगायला सुरुवात केली.हो, तो विवेक होता. मी विवेकला घेऊन कॉलेज आलो. विवेक पार्किंगच्या बाहेरूनच थँक्यू म्हणून निघून गेला. मी गाडी लावली आणि नोटीसबोर्ड जवळ आम्याला शोधायला जाणार होतो पण लेक्चरला जायला उशीर होत होता म्हणून सरळ वर्गात जाऊन बसलो. लेक्चर झाल्यावर आम्या भेटला, मी त्याला विचारले, "बंटीची तब्येत आता कशी आहे."माझ्या मागून आवाज आला, "कशी आहे तब्येत आता"मी मागे वळून पाहिले तो विवेक होता. आम्याने उत्तर दिले, "ठीक आहे आता"मी विचार करायला लागलो, हा विवेक कसा काय ओळखतो आम्याला. मी प्रश्न विचारणार तितक्यात विवेक बोलला, "ठीक आहे काळजी घे, मी जातो उशीर होतो आहे मला, बाय"मी काही