पेरजागढ- एक रहस्य.... - १७

  • 10.6k
  • 4.6k

१७) गडाविषयी काकांचं मनोगत...त्या दिवशी पेरजागडावरून येताना बऱ्याच काही शंका मनात धरून मी आलो होतो.ते सुन्न जंगल,आणि ते भयानक वातावरण,आणि ते छम छम् तर माझ्यासाठी एक कोडंच होतं.घरी परतल्यावर सगळ्यांनीच तसं माझी खुशहाली विचारली...काय मग?कसा वाटला पेरजागड? मी म्हटलं... बरंच आहे...कारण थकून असल्यामुळे मी फार तर बोलूच शकणार नव्हतो.पण गावात कसं असतं, गप्पांचा विषय चालू करण्यासाठी एखादं विषय लागतो.कदाचित घरी येता येता पेरजागड हाच एक विषय झाला होता.अलीकडे घडलेल्या बऱ्याच गोष्टी याच्या त्याच्या मुखातून बरेचदा ऐकत होतो.काही दिवसांपूर्वी म्हणे ट्रॅक्टर उलटली होती.ज्यामुळे बऱ्याच प्रमाणात जीवितहानी आली होती.त्याचे कारण चालकांनी बऱ्याच प्रमाणात दारूचे सेवन केले होते आणि काही स्त्रिया मासिक पाळीवर