मित्रांचे अनाथाश्रम - भाग ५

  • 11.3k
  • 4.8k

कॉलेज संपल्यावर आम्ही दोघे आश्रमात गेलो त्यानंतर आम्या ने ती पिशवी उघडली. त्यात दोन कॅडबरी आणि एक चिठ्ठी होती. आम्याने ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. "माझ्या गाडीत काहीतरी खराबी होती म्हणुन मी दोन वेळा तुमच्या गाडीला येऊन धडकले म्हणुन माफी मागते. तरी तुम्ही माझी मदत केली म्हणुन खुप खुप धन्यवाद - संध्या सावंत"मी, "अच्छा ही सायन्स ब्रांच ची आहे"आम्या, "तुला कसं काय समजलं"मी, "ते बघ ना चिठ्ठी प्रॅक्टिकल च्या पेपर वर लिहिली आहे."आम्या, "हुशार आहे तु"मी, "संगतीचा प्रभाव"दोघंही हसायला लागलो. मागुन सुरेश काका धावत आले, "बंटी ने एक रुपयाचं नाण गिळून घेतलं, चल त्याला दवाखान्यात घेऊन जाऊ. बोलता पण येत नाही