*चेहऱ्यावर हसु आणि डोळ्यात पाणी आहे* आम्ही एकाच कॉलनीत राहतो. मी तिच्यापेक्षा तीन वर्षाने मोठा आहे. मी जेव्हा जेव्हा तिच्या घरासमोरुन जात असतो, तेव्हा तेव्हा ती माझ्याकडे बघत असते. मला वाटतं तिचं माझ्यावर प्रेम आहे. ती दिसायला सुंदर आणि स्वभावाने तर खुपच चांगली आहे, मला ही ती खुपच आवडते पण, सर्वात मोठी अडचण काय आहे माहीती आहे का?. ती माझ्या बेस्ट फ्रेंडची सखी बहीण आहे. पण मी तिला खुप आवडतो, जेव्हा मी माझी आंघोळ वगैरे आवरुन बाहेर येतो, तोपर्यंत ती मला पाहण्यासाठी दारात उभी असते. जोपर्यंत मी बाहेर येत नाही आणि मला एकदा बघत नाही तोपर्यंत ती कॉलेजला जात नाही.