जोडी तुझी माझी - भाग 41

  • 10.2k
  • 5.6k

आई - अहो पण आज विवेकला सांगून आली असती किंवा त्याच्या सोबत तर काय बिघडत होतं?? अजून तरी तिने नात संपवलं नाही आहे ना मग नवरा होता ना तिचा.. आणि तो काळजी करतो ते चूक आहे का?? तिला कळायला नको का? अस त्याला तिथेच तातकळत ठेऊन निघून आली.. बरोबर आहे का हे?? त्याच फोन आला नसता तर आतापर्यंत आपल्या जीवाला घोर लागला असता, किती जबाबदारीने त्याने आपल्याला कळवलं... आणि मधून मधून पण आपली विचारपूस करत असतो..बाबा - अग ती एकटी नाहीच आली , विवेकची गाडी तिच्या मागेच होती, फक्त हिला माहिती नव्हतं ती तुझ्या शी बोलत असताना मी खिडकीतून बघितलं