अनोखे मिलन

  • 7.5k
  • 2.6k

आई मी शाळेत जातो, असं म्हणत राजीव शाळेत जायला निघाला.. अरे थांब, आई जवळ येत म्हणाली, मी दिलेला डब्बा पूर्ण खाशील आणि राहूल ला देशील, (राहुल-राजीव जिवलग मित्र,जीव की प्राण, अभ्यास सोबतच करायचा,सोबतचं राहायचं,यांच्या मैत्रीला पाहून तर मुलं-मुलीही जळत असत) कारण ही तसेचं होते, एकमेकांच्या आयुष्यात एवढे खुश की कुठे काय चाललंय, यांना अजिबात माहिती नसायचं, बरं असो, आईला हो म्हणत राजीव शाळेत?️ निघुन गेला... अरे ये राजीव, दुरूनच दिसताच राहुल ने त्याला हाक दिली, मी तुझीचं वाट बघतोय! अरे परीक्षा तोंडावर आली,आपल्याला अभ्यासाचा जोर पुन्हा वाढवावा लागेलं नं... जशी आपली मैत्री,? सगळ्यांना जळवीत असते,तसचं आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत चांगल्याच मार्कांनी