लहान पण देगा देवा - 10

  • 7.5k
  • 2.4k

भाग १० अथर्व- साक्षी चल येतेस ना घरी आजी आजोबा शी बोलायचं आहे. मला एकट्याला त्यांना हे सर्व सांगून मनवन खूप कठीण आहे. साक्षी- अथर्व विचार तू केलास सर्व काही तू ठरवलंस, मी तुला फक्त सपोर्ट करणार आहे, कोणालाही काही समजावणार नाही, ती तुझी जबाबदारी, आणि हो जर या सर्व गोष्टी मुळे आजी आजोबा मला ओरडले तर यादराखा, मी तुझी थोडी देखील मदत करणार नाही. आठवत ना मला तुला एकदा सुट्टी वरून परत जायचं नव्हतं म्हणून किती नाटक केलंस आणि मला पण करायला लावलं, तुझ्यामुळे आजी आजोबा आणि वरून तुझे आई बाबा पण ओरडले मला. त्यामुळे यावेळेस फक्त