२९ जून २०६१ - काळरात्र - 13

  • 9.8k
  • 1
  • 3.8k

“म्हणजे आपल्याला ते कुठेतरी लिहून ठेवावे लागतील असंच ना? कुठे लिहायचं? आपण एखाद्या कागदावर नावाखाली आपल्याला पडलेला फसा लिहून ते एखाद्या एन्व्होलोपमध्ये ठेवूयात.” रचना म्हणाली. “हो आपण तसंच करुयात. आपण एका बॉक्स मध्ये ठेऊ.” रचना म्हणाली. “सेम, एझॅक्टली.... त्यांनीपण असंच केलं होतं.” हंसीका हताशपणे फास्यांकडे बघत म्हणाली. “म्हणजे ते आपल्यापेक्षा पुढे आहेत तर.” शौनक म्हणला. “होय, त्यांनी बॉक्समध्ये काहीतरी युनिक वस्तु ठेवली होती. आपणसुद्धा तसंच करुयात.” रचना म्हणाली. “जर आपण काहीतरी वेगळं करत असू तर ते सुद्धा काहीतरी वेगळं करत असतील. हा... हा... हा...” असं म्हणून सारंग जोरजोरात हसायला लागला.