२९ जून २०६१ - काळरात्र - 11

  • 8.9k
  • 3.5k

“तुझं बोलणं तसंच आहे. अगदी तसंच. कॉलेजमधल्या दिवसांतल. काहीच बदल झाला नाही तुझ्यात.” रचना परत शौनकच्या जवळ जात म्हणाली. “अच्छा, काय करणार आता?” शौनक निर्विकारपणे म्हणाला. शौनक आणि रचनाचं हे बोलणं किचनच्या एका कोपर्‍यातून आर्या ऐकत होती. रचना शौनकला मिठी मारण्याचा प्रयत्न करणार तोच अचानक आर्या किचन मधून हॉलमध्ये जाण्यासाठी निघाली आणि तिला बघून शौनक म्हणाला, “रचना प्लीज, यू आर क्रॉसिंग यॉर लिमिट्स....” रचना दूर झाली आणि किचनकडे जाण्यासाठी निघाली. आर्या हॉलमध्ये आली आणि हंसीका समोर बसली. तोपर्यंत आर्याने मैत्रिणीचं कर्तव्य म्हणून हंसीकाला शौनक आणि रचनाच्या गोष्टी सांगितल्या. रचना हॉलमध्ये आली आणि आर्याच्या बाजूला बसली.