कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - २९ वा

  • 9.8k
  • 3.9k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग-२९ वा ----------------------------------------------------------- गच्चीवर मैफिलीची बैठक व्यवस्था करून झाली ..त्याआधी सर्वांची जेवणे गच्चीवर करायची , असे ठरलेले होते , त्यासाठीची गडबड सुरु झाली . मधुरा आणि तिच्या मैत्रिणीनी तयार केलेले जेवणाचे विविध पद्रार्थ आणायला सुरुवात केली . त्यांच्या मदतीला अंजलीवाहिनी होत्या . चौधरीकाका –काकु , यशचे आई आणि बाबा , आजी आणि आजोबा , सुधीरभाऊ हे सगळेजण गच्चीवर येऊन बसले ... समोरची सुंदर सजवलेली बैठक , आणि दुसर्या बाजूला , भोजनाची सुरु असलेली तयारी पाहून मोठी मंडळी खुश होऊन गेली . बनवलेल्या भोजनाचा खमंग दरवळ घेऊन .. भूक लागली हो ... ! चला पाने घ्या पटापट